वर्धा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपपंतप्रधान पदाची आॅफर दिली आहे.शरद पवार यांनी काँग्रेस सोबत न जाता भाजपप्रणित एनडीएत यावे ते नक्की उपपंतप्रधान होतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्यासाठी काॅंग्रेस प्रयत्न करीत आहे. ममता बॅनर्जी, देवेगौडा, चंद्राबाबू नायडू हे अन्य नेतेदेखील पंतप्रधान पदाच्या शर्य़तीत आहे. शरद पवार हे राहुल गांधींना आणि राहुल हे पवारांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देऊ शकत नाही.दरम्यान, पवार जर एनडीएमध्ये आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं रामदास आठवले म्हणाले.