राज्यात 24 हजार 962 मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम

मुंबई, दि. 23 : ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी, दि. 22 रोजी तब्बल 24 हजार 962 मेगावॅट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली.    यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात 21 हजार 580 मेगावॅट तर मुंबईमध्ये3 हजार 382 मेगावॅट विजेची मागणी होती.सध्या ऑक्टोबर हिटच्या झळांनी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही ऑक्टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. राज्यात गेल्या दि. 16 ऑक्टोबरला 24 हजार 922मेगावॅट तर महावितरणकडे 21 हजार 542 मेगावॅट, दि. 17 ऑक्टोबरला 24 हजार 687 मेगावॅट तर महावितरणकडे 21हजार 223 मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबरला ही मागणी 24 हजार 962 मेगावॅटवर गेली. आजवरची ही उच्चांकी मागणी आहे. याच दिवशी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात 21 हजार 580 मेगावॅट विजेची मागणी होती. एकदम विजेची मागणी वाढल्यामुळे योग्य नियोजनाद्वारे महावितरणकडून 20 हजार 630 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला. राज्यात ज्या वाहिन्यांवर सर्वाधिक वीजहानी आहे, वीजदेयकांची वसुली अत्यंत कमी आहे, अशा जी-1 ते जी-3 गटातील वाहिन्यांवर 950 मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले.राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20 हजार 630 मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24 हजार 12 मेगावॅट वीज पारेषीत केली

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading