युतीसाठी शिवसेना तयार, पण मागण्या पाहून भाजपा हैराण!

मुंबई : लोकसभेबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेचीही निवडणूक घ्या आणि दोन्ही निवडणुकात युतीमध्ये आम्हाला ५० टक्के जागा लढायला द्या, असा प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो. भाजपाकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास ही भूमिका स्पष्टपणे मांडण्याचे शिवसेनेत ठरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.राज्यात युतीमध्ये मोठा भाऊ कोण आहे हे मतदार निवडणुकीत ठरवतील पण युती करायची असेल तर फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्य$ुला मान्य करावा लागेल, असे शिवसेनेकडून भाजपाला सांगितले जाईल. या शिवाय, पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्या यावर शिवसेना अडून बसेल. लोकसभेच्या ४८ पैकी २४ तर विधानसभेच्या २८८ पैकी किमान १४४ जागांच्या खाली युतीमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारायची नाही, असा सूर शिवसेनेत असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा आपल्याबरोबर युती करेल आणि गेल्यावेळेप्रमाणे विधानसभेत स्वबळावर लढेल, अशी शंका शिवसेनेला वाटते. त्यामुळेच एकत्रित निवडणुकीचा आग्रह शिवसेनेकडून धरला जाईल, असे म्हटले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडे भाजपाचे आमदार आणि जिल्हाध्यक्षांची जी बैठक घेतली होती तीत, दोन्ही निवडणुका एकत्र लढविल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading