नांदेड : चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 या चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात 30 व 31 ऑगस्ट 2024

रोजी तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व दि. 1 व 2 सप्टेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी.

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading