केंद्रातील व राज्यातील भाजप सेनेच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनता अत्यंत अस्वस्थ असून शेतकरी शेतमजूर देशोधडीला लागला आहे. दलित व मुस्लीम अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. युवक वर्ग बेरोजगार झाला आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन त्या असुरक्षित आहेत. सरकारमधील जबाबदीर मंत्री खुलेआम संविधान बदलण्याची भाषा करतात. सामाजिक ध्रुवीकरण करून जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे काम करत आहेत. देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचे काम राज्यकर्त्याकडून चालू आहे, अशा सनातनवादी धर्मवादी आणि मनूवादी विचारधारेच्या सरकारला विरोध करुन उखडून फेकण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वससामान्य गोरगरीब, दलित अल्पसंख्यांक, तरुण व शेतकरी-शेतमजुराचा आवाज बुलंद करण्यासाठी या सभेचे आयोजन केल्याचे संयोजन समीतीकडून सांगण्यात आले. कन्हैयाच्या या सभेला आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे, कॉम्रेड प्रदीप नागापुरकर, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, बाबर मोहम्मद, सच्चर कमिटीचे डॉ. गुलाम गफ्फार, माजी उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे, राष्ट्रवादी लोहा विधानसभा अध्यक्ष बाबुराव केंद्रे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार शंकर धोंडगे राहणार आहेत.