‘गांधी आता सत्ता देऊ शकत नसल्यानं जनता नथुरामाच्या पायाशी लोळण घेत आहे’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. 2014 च्या निवडणुकीनेतर आघाडीमध्ये उतरण सुरू झाली तर आता 2019 मध्ये आघाडीची झालेली अवस्था पाहून आघाडीतील मोठमोठे नेत्यांनी सत्ताधारी युती पक्षांची वाट धरली आहे. याच पार्ष्वभूमिवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परखड शब्दात भाष्य केले आहे.

सत्ता देणारा नथुराम हा सर्वांनाचा आवडायला लागला आहे. गांधी आता सत्ता देऊ शकत नसल्यानं जनता नथुरामाच्या पायाशी लोळण घेत आहे. अशा शब्दात आव्हाड यांनी पक्ष सोडून जाणा-यांवर टीका केली आहे.

ते म्हणाले, राष्ट्रवादीचे सचिन अहीर यांना शरद पवार साहेबांनी लहान वयातच सर्वकाही दिलं. त्यांना आमदार, मंत्री बनवलं आणि मोठं केलं. त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मीसुद्धा बऱ्याचदा मध्यस्थी केल्याचेही त्यांनी सांगीतले.
वयाच्या 80 व्या वर्षी पवार साहेब राज्याचे दौरे करत आहेत. साहेबांनीच आम्हाला लहानातून मोठं केलं आहे. असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

कॉंग्रेस सोबतच राष्ट्रवादीचेही दिग्गज नेते सत्ताधारी पक्षात जात आहेत यावर भाष्य करताना आव्हाड यांनी भाजप प्रमुखांना नथुरामाची उपमा दिली आहे.

The post ‘गांधी आता सत्ता देऊ शकत नसल्यानं जनता नथुरामाच्या पायाशी लोळण घेत आहे’ appeared first on Maharashtra Today.

Source

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading