नांदेड:क्रेनच्या टोपल्यातून विहिरीत पडल्याने मजुराचा मृत्यू, ३ गंभीर जखमी جنوری 12, 2019 by WARAQU-E-TAZA नांदेड – जिल्ह्यातील शहापूर (ता. अर्धापूर) शिवारातील सुदर्शन पवार यांच्या विहिरीत माल काढणाऱ्या क्रेनच्या टोपल्यात मजूर बसून जात होते. विहिरीच्या काठावर टोपले आदळून हुक तुटल्याने ४ जण गंभीर झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यात एकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (११ जानेवारी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील सुदर्शन पवार यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम चालू आहे. या विहिरीवर काम करणारे मजूर दिगंबर बेले (वय ३५), गजानन खैरे (वय ३६), रायभान खोले (वय ४५) हे विहिरीतील माल काढणाऱ्या टोपल्यात बसून विहिरीत उतरत होते. यावेळी टोपले विहिरीच्या काठावर आदळल्यामुळे टोपल्याचे हुक निसटले. यात सर्व जण विहिरीत पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. तसेच विहिरीच्या वर क्रेनजवळ उभ्या असलेल्या संगिताबाई खोले (वय ३५) यांनाही क्रेनचा मार लागल्यामुळे त्याही गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दिगंबर बेले यांचा (११ जानेवारी)शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp