गेल्या साडेचार वर्षात जनतेचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षच सत्तेत हवा अशी जनतेची इच्छा आहे. जनभावना लक्षात घेत आम्ही जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी यवतमाळ येथून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही पोहोणार आहोत. जनतेचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि भाजप सरकारने जनतेची केलेली फसवणूक याबाबत आम्ही जनतेशी थेट संवाद साधणार आहोत, असेही ते म्हणाले.तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चत आहे. आम्हाला या आघाडीत प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे. त्याबाबत आंबेडकरांसोबत आमचे बोलणे सुरू आहे. सध्या भाजप सरकारकडून आमच्या पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचे फोन टॅप केले जात आहेत. मात्र, हा सगळा प्रकार जास्त काळ टिकणार नाही, असा विश्वासही चव्हाणांनी व्यक्त केला.