शिधापत्रिकाधारकांच्या नावावर अंगठे मारुन धान्य उचलणार्‍या स्वस्तधान्य दुकानदारावर कारवाई करा

सामाजिक कार्यकर्ते मो. रफिक (मुश्शी) यांची मागणी
नांदेड (प्रतिनिधी)- शासनातर्फे समाजातील वंचित घटकांना धान्य मिळावे, धान्याचा काळ्या बाजारावर अंकुश लावण्यासाठी शासनाने ऑनलाईन पद्धत सुरु केली आहे. परंतु स्वास्त धान्य दुकानदार व संबंधीत अधिकारी हे त्यांच्या पदाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात धान्य वाटपामध्ये काळाबाजार करत असून रुट अधिकारी ऐवजी स्वत:च अंगठे मारुन धान्याची उचल करणार्‍या स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मो. रफिक उर्फ मुश्शीभाई यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
धान्यापासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी शासनाने रुट अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. असे असतांना सुद्धा संबंधीत अधिकार्‍यांनी राशन दुकानदारांना पासवर्ड दिले आहेत. राशन दुकानदार स्वत: अंगठे मारुन 40 ते 70 टक्के पर्यंत लाभार्थ्यांचे धान्य परस्पर उचल करीत आहेत. शहरातील एका स्वस्तधान्य दुकानदाराने 335 लाभार्थ्यांना ऑनलाईन धान्य वाटप केले त्यातील 186 लोकांच्या नावावरचे धान्य रुट अधिकारी आधारे उचल केली आहे. त्याच बरोबर ऑगस्ट महिन्याचे राशन काही कारणास्तव दुकानदारांना उशिरा देण्यात आले होते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना धान्य वाटप करता आले नाही. याचा गैरफायदा घेत काही राशन दुकानदारांनी वाटप रजिस्टरवर नोंद घेवून लाभार्थ्यांना धान्य दिल्याचे खोंट्या नोंदी घेतल्याचा संशय आहे. हा सर्व प्रकार बेकायदेशीर रित्या सर्रासपणे सुरु आहे. ऑनलाईनमुळे धानयाचा काळा बाजारावर आळा न बसता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. राशन दुकानदार व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने हा काळा बाजार सर्रासपणे सुरु आहे. सदरील प्रकारावर आळा बसण्यासाठी व या काळ्या बाजाराची रास आईडी मार्फत  चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रफिक उर्फ मुश्शीभाई यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे
Leave a comment