मनसेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन  साजरा 

0 29
नांदेड :17 Sep.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा वर्धापन दिन मनसेच्या वतीने साजरा करण्यात आला. विसावा उद्दान मधील हुतात्मा स्मारकास मनसेच्या वतीने पुष्प अर्पण करून वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
रज्जाकरांची हुकूमशाही उलथवून टाकत मराठवाड्याला जुलमी राजवटीतून मुक्त करणाऱ्या वीर हुतात्म्यांना आज मराठवाडा मुक्ती संग्राम  दिनानिमित्त महाराष्ट्र नवं निर्माण सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्दानातील हुतात्मा स्मारकास पुष्प अर्पण करण्यात आले, यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार , शहराध्यक्ष शफिक शेख, मनविसे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील बरडे, मासे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुनेवाड, अनिकेत परदेशी, बालाजी एकलरे, शुभम एडके, सचिन वेदपाठक, केदार नांदेडकर, शिवराज पाटील, अक्षय ठाकूर, पप्पू मनसुके, अंकित तेहरा, संतोष बनसोडे  यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .