MeToo: बॉलिवूडच्या या ११ महिलांनी घेतला एक मोठा निर्णय  

मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या ११ दिग्गज महिलांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुणावरही लैंगिक शोषणाचे वा गैरवर्तनाचे आरोप आहेत, जे या आरोपात दोषी आहेत, अशा कुठल्याही व्यक्तीसोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे. या ११ महिलांमध्ये अलंकृता श्रीवास्तव, आमिर खानची पत्नी किरण राव, एकता कपूर, कोंकणा सेन शर्मा , नंदिता दास, नित्या मेहरा, गौरी शिंदे, रिमा कागती, सोनाली बोस, झोया अख्तर, रूची नारायण अशा बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज महिलांचा समावेश आहे.कोंकणा सेन शर्माने आपल्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. एक महिला आणि दिग्दर्शक या नात्याने आम्हा सर्व महिलांचा मीटूलापाठींबा आहे. स्वत:वरील लैंगिक शोषणाविरोधात बोलायची हिंमत दाखवणाºया सर्व महिलांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. हा एक मोठा बदल आहे, असे कोंकणा सेन शर्मा हिने लिहिले आहे.
मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक महिलांनी लैंगिक शोषण व गैरवर्तनाविरोधात आवाज उठवत अनेकांचा पर्दाफाश केला आहे. यात विकास बहल, साजिद खान, लव रंजन, आलोक नाथ, सुभाष कपूर, रजत कपूर, सुभाष घई, कैलाश खेर अशा अनेकांचा समावेश आहे.

news by lokmat. com

Leave a comment