नागपूर | #MeToo या चळवळीनं जगभरात सध्या चांगलाच जोर धरला आहे, मात्र यामध्ये खोट्या तक्रारीसुद्धा होत आहेत. अशीच खोटी तक्रार करणाऱ्या एका तरुणीला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. एपीआयविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या तरुणीवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत. एपीआय राजेंद्र मगदूम यांना घर विकत हवं होतं. तक्रारकर्तीनं घर विकण्याची तयारी दाखवली होती. मगदूम यांनी 20 लाख रुपयांचा व्यवहार करताच तक्रारकर्तीने घर विकण्यास नकार दिला तसेच मगदूम यांच्याविरोधातच तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रारकर्तीच्या धमकीचे रेकॉर्डिंग आणि इतर सबळ पुरावे सादर करताच न्यायालयाने तक्रारकर्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.