हिंगोलीमध्ये भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड; माहूरचे महंत निवडणुकीच्या आखाड्यात

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली हे दोनच मतदारसंघ राखण्यात यश आले होते. थोड्याशा फरकाने शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव करुन राजीव सातव विजयी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हा मतदारसंघ जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपकडून सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

हिंगोली मतदारसंघ तीन जिल्ह्यात पसरलेला आहे. यात यवतमाळमधील उमरखेड, हदगाव – हिमायतनगर, हिंगोलीमधील वसमत, हिंगोली, कळमनुरी आणि नांदेडमधील किनवट, माहूर हे विधानसभा क्षेत्र येतात. माहुर येथील रेणुका देवीचा गड राज्यभरातील भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी याचे विशेष महत्व आहे. गडावरील महंतांचा या भागात विशेष प्रभाव आहे. त्यामुळे भाजपसाठी महंतांची उमेदवारी फायद्याची ठरू शकते. उत्तर भारतात भाजपने धर्मगुरुंना निवडणुकीत उतरविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.दरम्यान, महंत श्याम भारती हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. भाजपच्या अनेक कार्यक्रमात ते सामील असतात. आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, तरी आपण भाजपसोबतच राहू असे महंतांनी स्पष्ट केले आहे.
News by http://marathi.eenaduindia.com/
Leave a comment