दारूचे वाटप केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत- भाजप खासदार
गांधीनगर | दारूचे वाटप केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, असं अजब वक्तव्य भाजपाचे गुजरातमधील पंचमहलचे खासदार प्रभातसिंह चौहान यांनी केले आहे. लोक जनशक्ती पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दारूचे वाटप करण्यात आले आहे. दारू वाटपाशिवाय निवडणूक जिंकताही येत नाही. पण मी गळ्यात माळ घालतो. मी एक भगत आहे. दारू मी कधी पाहिलीही नाही, असं ते म्हणाले.दरम्यान, दारूचे वाटप केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठीच भाजपाने मला २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शंकरसिंह वाघेला यांच्याविरोधात पराभूत होण्यासाठी पाठवले होते, असंही त्यांनी सांगितलं