नांदेड:विज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

0 12
नरेंद्र रामराव राठोड (वय २९) हा तरुण शेतकरी आपल्या शेतात नियमीतपणे काम करत असताना दुपारी ४ च्या सुमारास शिवारात वादळी, वाऱ्यासह ढगाळ पाऊस सुरू झाला. विजेचा कडकडाट होत वातावरण बिघडले. या वातावरणामुळे घाबरलेल्या या शेतकऱ्याने स्व:तचा बचाव करण्यासाठी शेतातील झोपडीकडे धाव घेतली. यावेळी विज अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, २ मुली, पत्नी आणि १ भाऊ असा परिवार आहे. या तरुण शेतकयाच्या मृत्यूने दयाल धानोरा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे