२० षटकांत २७८ धावा; अफगाणिस्तान संघाने ‘विराट’ सेनेचे सर्व विक्रम मोडले

डेहराडून : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने शनिवारी विक्रमांची आतषबाजीच केली. आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानने ३ बाद २७८ धावा कुटल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही कोणत्याही संघाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. या विक्रमासह अफगाणिस्तानने इंडियन प्रीमिअर लीगमधील विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूररू संघाचे विक्रम मोडले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या हझरतुल्ला झाझई आणि उस्मान घाणी यांनी आयर्लंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३६ धावा चोपल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये हाही एक विक्रम ठरला. झाझई आणि घाणी या जोडीने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading