अकोला , दि. ०४ :- अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणात 1 महिन्यापूर्वी विवाह झालेल्या पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड येथील धरणात अकोट येथील पटेल चौकात एका इमारतीमध्ये राहणारे शारीक अली साजिद अली (वय 35) व त्याची पत्नी अनिका शायन शारीक अली (वय 23) हे दोघेजण 3 मार्चच्या दुपारी बाहेर जातो असे सांगून विना नंबरच्या नवीन मोटारसायकलने गाडीने गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाही. त्यांचे मोबाईल सुद्धा बंद येत असल्याने नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी त्यांची मोटरसायकल धरणाच्या बाजूला आढळून आल्याने शंका निर्माण झाली. याबाबत तात्काळ पोलिसांच्या मदतीने 3 मार्च रोजी रात्री अनिका शायान हिचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर तिचा पती शारीक अली याचा मृतदेह 4 मार्च रोजी सकाळी काढण्यात आला. पोपटखेड येथील युवकांनी रात्रभर मृतदेहाचा शोध घेतला. घटनास्थळावर पोलिसांनी महिलेची चप्पल, बूट, मोटरसायकल असे सामान आढळून आले.
आकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपनार हे पुढील तपास करत आहेत.घड़लेल्या घटने मुळे दुख व्यक्त केले जात आहे