देशातील अनेक राज्यांत मृदासंधारण क्षमता कमी झाली आहे. यात सुधारणा न झाल्यास देशाच्या अनेक भागात तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची भीती आहे. सन २०१५-२०१६ सारखी तीव्र दुष्काळी परिस्थिती होईल, असा इशारा एमआयटी, गांधीनगरचे सहप्राध्यापक विमल मिश्रा यांनी दिला आहे.एका अहवालानुसार २०१५-२०१६ मध्ये ११ राज्यातील अडीच लाख गावांत राहणाऱ्या ३३ कोटी नागरिकांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले होते. सध्या कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगढ, आंध्राप्रदेश आणि उत्तर-पूर्वेतील राज्यांचा समावेश आहे. हवामान खात्याने सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के २०१८ मध्ये पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात सरासरी केवळ ९१ टक्के पाऊस झाला आहे.