‘महाआघाडीसाठी कॉंग्रेस ‘तैय्यार’ पण प्रकाश आंबेडकरांकडूनच होतेय टाळाटाळ’

पुण: बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस तयार आहे. पण ते आमच्या प्रस्तावावर टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे हेच अद्याप समजत नाही, असा आरोप काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चव्हाण शुक्रवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँंग्रेस पक्ष देशभरात निरनिराळ्या पक्षांशी आघाडी करीत आहे. राज्यातसुद्धा छोट्या-मोठ्या पक्षांबरोबर आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीला मिळू नये, हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक आम्ही वेगवेगळी लढल्याने आमचे नुकसान झाले होते. यावेळी ते टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्यानेच आंबेडकरांना सहभागी करुन घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत. पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading