मनमाड | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना धमकी दिल्यामुळे भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धमकी दिल्याच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांनी मनमाडमध्ये मोर्चा काढला होता.या मोर्चामध्ये अनेक समर्थक सहभागी झाले होते. धमकी देणाऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.नाशिकमधील भुजबळ फार्ममध्ये एक निनावी पत्र सापडलं होतं. त्या पत्रात भुजबळांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.तसंच मनुस्मृतीबद्दल आणि संभाजी भीडेंबद्दल काही बोललात तर संपवून टाकू, असा मजकूर या पत्रात लिहिला होता