नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल

नवी दिल्ली – हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी फर्म असलेल्या सायफर ट्रेसने केलेल्या दाव्यानुसार क्रिप्टोकरंसी एक्सेंजरांनी 2009 पासून सुमारे 18 हजार कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉइनचे लाँड्रिंग केले आहे. हे क्रिप्टो करंजी एक्सचेंजर्स भारताबाहेर असून, जे भारतातून मनी लाँड्रिंग करत आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणार कुठलाही मनी लाँड्रिंग कायदा अस्तित्वात नाही. वरील 1800 हजार कोटींच्या व्यवहारांमध्ये सायफर ट्रेसने नजर ठेवलेल्या आपराधिक आणि अतिशय संशयास्पद व्यवहारांचाच समावेश आहे. सायफर ट्रेसने आघाडीच्या 20 क्रिप्टोकरंसी एक्सचेंजच्या माध्यमातून झालेल्या तब्बल 35 कोटी व्यवहारांची पडताळणी केली. तसेच त्यापैकी दहा कोटी व्यवहारांची दुसऱ्या पक्षांशी जुळवणूक करून पाहिली. या एक्सचेंजचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी करण्यात आलेल्या 2 लाख 36 हजार 979 बिटकॉइन्सच्या वापरासाठी झाला होता. सायफर ट्रेसने मनी लाँड्रिंगशिवाय हॅकिंग आणि क्रिप्टोकरंसीच्या चोरीचाही छडा लावला आहे.

News by lokmat. com

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading