नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसची सदस्यता घेतली. शरद पवार यांनी राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी घेतलेली भूमिका तारिक अन्वर यांना पटली नव्हती. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला होता.आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं, मात्र ते पुन्हा काँग्रेसमध्येच जातील, असे स्पष्ट संकेत त्यांच्या बोलण्यातून मिळाले होते. तारिक अन्वर बिहारच्या कटिहारमधून खासदार होते. त्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे