अहमदाबाद – गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक रूप घेतले असून, स्थानिकांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे हजारो उत्तर भारतीयांनी पलायन केले आहे. आता गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसलाजबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे.
बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले असून, या हल्ल्ल्यांसाठी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या मनात बिहारील नागरिकांविषयी एवढा द्वेष का आहे, असा सवाल जेडीयूने या पत्रामधून केला आहे.
news by lokmat. com