नांदेड – जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याने युवक काँग्रेसच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड-नागपूर महामार्गावरील बाबा पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रसने आंदोलन केले होते.शहरातील भोकर परिसरात पोलिसांच्या परवानगीशिवाय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल आणि डिझेल निषेधार्थ गुरुवारी आंदोलन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फलकाला काळे फासले होते. बेकायदेशीरपणे जमाव करून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमादार परमेश्वर यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यावरून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, माधव कदम, संजय टेकाळे, भगवान तिडके यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार काळे करत आहेत.