माहूर – वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांविरोधात फेसबुकवर माहूर येथील वल्लभ विजयराव आमले या व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट लिहली आहे. याप्रकरणी शिवाजी देविदास जोगदंड यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमाखाली सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली. माहूर तालुका महासचिव दादाराव गायकवाड व वाई सर्कल प्रमुख सुशील रणवीर, गजानन केळकर, मिलिंद गायकवाड, विजय खडसे, राहूल पट्टेकर, शैलेश पारधे हे यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.सोमवारी दुपारी अंदाजे ३ वाजण्याच्या सुमारास माहूर येथील वल्लभ याने प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरुद्ध अश्लील भाषेत आक्षेपार्ह पोस्ट केली. सदर फेसबुक पोस्टमध्ये या दोन नेत्यांविषयी अत्यंत अश्लील भाषेत लिखाण केले होते. वल्लभने जाणीवपूर्वक हे लिखाण केले असल्याचे निवेदनकर्त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. वल्लभने आंबेडकर आणि ओवेसी या दोन्ही नेत्यांबाबत अश्लील लिखाण करुन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही पोस्ट फेसबुक पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. कार्यकर्त्यांचे लोंढे माहूर पोलीस ठाण्याबरोबरच सिंदखेड पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी वल्लभवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि आयटी अँक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यानंतर माहूर पोलीस ठाण्यात कलम २९४, २९५ ए, ६७(अ) नुसार सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. तर सिंदखेड पोलीस ठाण्यात या संदर्भात कार्यकर्त्यांनी तक्रार देवून अॅट्रोसिटी अॅक्टसह इतर आवश्यक कलमांसह गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली. माहूर तालुका महासचिव दादाराव गायकवाड व वाई सर्कल प्रमुख सुशील रणवीर, गजानन केळकर, मिलिंद गायकवाड, विजय खडसे, राहूल पट्टेकर, शैलेश पारधे हे यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.सोमवारी दुपारी अंदाजे ३ वाजण्याच्या सुमारास माहूर येथील वल्लभ याने प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरुद्ध अश्लील भाषेत आक्षेपार्ह पोस्ट केली. सदर फेसबुक पोस्टमध्ये या दोन नेत्यांविषयी अत्यंत अश्लील भाषेत लिखाण केले होते. वल्लभने जाणीवपूर्वक हे लिखाण केले असल्याचे निवेदनकर्त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. वल्लभने आंबेडकर आणि ओवेसी या दोन्ही नेत्यांबाबत अश्लील लिखाण करुन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही पोस्ट फेसबुक पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. कार्यकर्त्यांचे लोंढे माहूर पोलीस ठाण्याबरोबरच सिंदखेड पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी वल्लभवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि आयटी अँक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यानंतर माहूर पोलीस ठाण्यात कलम २९४, २९५ ए, ६७(अ) नुसार सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. तर सिंदखेड पोलीस ठाण्यात या संदर्भात कार्यकर्त्यांनी तक्रार देवून अॅट्रोसिटी अॅक्टसह इतर आवश्यक कलमांसह गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.