शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून भाजपच्या राज्यमंत्र्यांचं फोटोसेशन

मुंबई | राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण चांगलेच अडचणीत सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून चव्हाण यांनी फोटोसेशन केलं आहे.रवींद्र चव्हाण यांचा हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढल्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण आणि अन्य नेत्यांनी व्यासपीठावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि अभिवादन केले. त्यानंतर फोटो काढत असताना रवींद्र चव्हाण यांना भान राहिले नाही, असं दिसतंय

Leave a comment