कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोत ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी साखळी बॉम्बस्फोटात २५३ नागरिक ठार झाले तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारने झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी घातली आहे.
पीस टीव्हीच्या सहाय्याने झाकीर नाईक हा तरुणांचे ब्रेनवॉश करतो. तसेच त्या तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळेच भारत व बांग्लादेशने झाकीर नाईकच्या या चॅनेलवर आधीपासूनच बंदी घातली आहे. श्रीलंका बॉम्बस्फोटात देखील त्याचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.a