नांदेड जिल्हा बँक घोटाळ्यात संचालकावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश;सर्वच पक्षांतील दिग्गजांचा समावेश

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००० ते २००३ या काळात झालेल्या ३५० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन २७ संचालकांविरुद्ध गुन्हे नोंदवून दोन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्या़एऩएलग़ायकवाड यांनी दिले आहेत़ माजी संचालकांमध्ये माजी खासदार, माजी आमदारांसह सर्वच पक्षांतील दिग्गजांचा समावेश आहे़

२००० ते २००३ या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जवळपास ३५० कोटींचा गैरव्यवहार झाला होता़ बँकेत नोकरभरती, संगणक खरेदी, नियमबाह्य इमारत भाडे, कमी किमतीत जुने वाहनविक्री, वाहन गैरवापर, नियमबाह्य खरेदी, प्रचलित व्याजदरापेक्षा अधिक दराने ठेवी स्वीकारणे, नियमबाह्य जाहिराती, चुकीची व्याज आकारणी, दूरध्वनीचा गैरवापर, नियमाबाह्य कर्ज मंजुरी असे २३ आरोप तत्कालीन संचालकांवर ठेवण्यात आले होते़ बँकेच्या लेखा परीक्षणात या सर्व बाबी उघड झाल्या होत्या़ २५ फेब्रुवारी २०१० रोजी तत्कालीन लेखा परीक्षक ए़एसग़ंभीरे यांनी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी सर्व संचालकांना दोषी धरुन त्यांच्याकडून गैरव्यवहाराची रक्कम वसूल करावी, अशी शिफारसही केली होती.

परंतु, त्याच गंभीरे यांनी २०११ मध्ये पुन्हा लेखापरीक्षण करुन बँकेच्या सर्व संचालकांना दोषमुक्त केले होते, हे विशेष! त्यानंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व संचालकांना ‘क्लीनचिट’ देत या प्रकरणात कोणतीही वसुली करु नये असे म्हटले होते़ या प्रकरणात सरकार दोषी संचालकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत क्रांतिकारी जयहिंद सेनेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ उच्च न्यायालयाने सदरील प्रकरण नांदेड येथील कनिष्ठ न्यायालय फौजदारी यांच्याकडे वर्ग केले़ या प्रकरणात क्रांतिकारी जयहिंद सेनेच्या वतीने अ‍ॅड़सुनील लाला यांनी युक्तिवाद केला़ त्यानंतर न्या़एऩएलग़ायकवाड यांनी बँकेच्या तत्कालीन २७ संचालकांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवावे़ तसेच पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत़ त्यामुळे यापूर्वी ‘क्लीनचिट’ मिळालेल्या संचालकांच्या अडचणीत भर पडली आहे़

या संचालकांवर आहेत गैरव्यवहाराचे आरोप-

माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर, बँकेचे माजी अध्यक्ष मोहनराव पाटील टाकळीकर, हरिहरराव भोसीकर, माजी खाग़ंगाधर देशमुख, दिगंबर पवार, माजी खा़सुभाष वानखेडे, माजी आ़रोहिदास चव्हाण, विजयकुमार राजूरकर, भगवानराव आलेगावकर, माजी आ़श्रीनिवास गोरठेकर, माजी नगरसेवक गफारखान महेमूद खान, माजी आग़ंगाधर ठक्करवाड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव केशवे, माजी महापौर मंगला निमकर, विद्यमान आ़प्रताप पाटील चिखलीकर, गंगादेवी केसराळे, मथुताई सांवत, बी़आरक़दम, विद्यानंद चौधरी, प्रकाश हस्सेकर, शंकरराव शिंदे, विवेक लोखंडे, शेषराव चव्हाण, बाबाराव एंबडवार, माधवराव वाघ, मंगलाबाई पाटील, भारतीबाई पवार अशा २७ संचालकांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत़

News by http://www.lokmat.com/

Leave a comment