नांदेडमध्ये डेंग्यूचा बळी ; वृद्धाचा मृत्यू

मुंजाजी डिगाजी मोळके असे मृत रुग्णाचे नाव आहे. ते हदगाव तालुक्यातील रहिवासी होते. ताप आला म्हणून नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांकडून रक्त तपासणी करण्यात आली. यात  त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.  त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, भाऊ बहीण, सुना, नातवंडे असा  परिवार आहे. ते पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिगंबर मोळके याचे ते वडील होत.दरम्यान, डेंग्यूच्या  रुग्णात वाढ झाली आहे. परंतु ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध नसल्याने अनेक  रुग्णांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा लागत आहे. त्यामुळे  आर्थिक भुर्दंड पडत आहे. तर अनेक गावात स्वच्छते चे तीन तेरा झाले असून नालीतील घाण, अस्वच्छ पाणी पुरवठा यामुळेही ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी या साथीच्या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Leave a comment