आझाद क्रीडा मंडळाच्या वतीने आ.बाबाजानी दुर्राणींचा नागरी सत्कार
परभणी : प्रतिनिधी . येथील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आझाद क्रीडा मंडळाच्या वतीने बी.रघूनाथ सभागृह येथे सायं. ७ वा. नुकत्याच विधान परिषद सदस्यपदी निवड झालेल्या आ. बाबाजानी दुर्राणी, यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.डॉ.फौजिया खान, प्रसिध्द उद्योजक मो.गौस, जलील पटेल,अब्दुल खालेद, अॅड. विष्णू नवले पाटील, शेख फसीयोद्दीन (रा.कॉ.उपाध्यक्ष)कामरान खान,डॉ.खाजा खान,बशीर अहेमद,मंसुर खान, सगीर खान,आदीं उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन महेमुद खान,संस्थापक अध्यक्ष मोईन खान,प्रा. कलीम काजी,मधुकर उमरीकर,प्रा.अरुण पडघन, शेख अझर, सय्यद इस्माईल, मुन्ना हाशमी,आदींनी केले होते.