तीन भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

रोशनी गायकवाड (वय ११), रोहन विष्णू गायकवाड (वय ९), तनीशा बालाजी गायकवाड (वय ११) असे मृत मुलांची नावे आहेत. तिघेही उमरज येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. आज महालक्ष्मीच्या सणामुळे शाळेला सुट्टी होती.  गावालगतच संत नामदेव महाराज मठ संस्थानची शेती आहे. याच शेतीमध्ये मृत भावडांचे आजोबा गणपत गायकवाड हे सालगडी म्हणून काम करतात.आजोबा बाहेरगावी गेले असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी हे तिघे बहीन-भाऊ शेतात गेले होते. त्यावेळी शेताजवळील बंधार्‍यात त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, पोहता येत नसल्याने या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी महालक्ष्मीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading