शिवसेनेकडून 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,हेमंत पाटील उमेदवार

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष भाजपा पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. शिवसेना यंदा एकूण 23 जागा लढवणार आहेत. शिवसेनेनं पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहे. सातारा आणि पालघरचे उमेदवार शिवसेनेकडून रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेनं जाहीर केेलेले उमेदवार:

उत्तर पश्चिम मुंबई- गजानन किर्तीकर
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
कल्याण- श्रीकांत शिंदे
ठाणे – राजन विचारे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
रायगड- अनंत गीते
हिंगोली- हेमंत पाटील
रामटेक – कृपाल तुमाने
कोल्हापूर- संजय मंडलिक
हातकणंगले- धैर्यशील माने
शिर्डी- सदाशिव लोखंडे
औरंगाबाद- चंद्रकांत खैरे
यवतमाळ- भावना गवळी
बुलडाणा- प्रतापराव जाधव
अमरावती- आनंदराव अडसूळ
मावळ- श्रीरंग बारणे
शिरुर- शिवाजीराव आढळराव पाटील
द. मुंबई – अरविंद सावंत
नाशिक- हेमंत गोडसे
परभणी- संजय जाधव

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading