शिवसेना दुतोंडी सापासारखी, बोलते एक आणि करते एक- प्रकाश आंबेडकर

मुंबई | शिवसेना ही दुतोंडी सापासारखी आहे, बोलते एक आणि करते एक. परंतु लोक अाता मूर्ख राहिलेले नाहीत, अशी जळजळीत टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यानी केली आहे.अयोध्या दौऱ्यावर जाणाऱ्या उद्धव ठाकरेंचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरेंनी राम मंदीर बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा मुंबईतूनच घेऊन जाव्यात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.आगामी निवडणुंकांमध्ये राष्ट्रवादी सोबत जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. आमचा लढा भाजप आणि संघाविरुद्ध आहे. त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असं ते म्हणाले.

नाॅन बँकिंग सेक्टर प्रचंड अडचणीत आहे. हाॅऊसिंग इंडस्ट्रीमधील लाखो कामगार आज घरी बसलेले आहेत. हे सर्व सरकारच्या खराब कामगिरीमुळे झालंय, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading