मुंब्रा बायपासच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत, 2669 रहिवाशांना दिलासा

ठाणे – मुंब्रा बायपासजवळील खालील भागात राहणा:या रहिवाशांना दर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भितीला सामोरे जावे लागत होते. मात्र ठाणे महापालिकेने आता येथील भागांसाठी तब्बल 13 ठिकाणी आरसीसीच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार यातील बहुतेक भिंतीचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे 2 हजार 669 रहिवाशांचा टांगणीला लागलेला जीव आता सुरक्षेच्या छायेखाली आली आहे.

मुंब्रा तसेच आजूबाजूच्या डोंगराच्या पायथ्याखाली असलेल्या रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. बुधवारी कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात दरड कोसळून दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु भविष्यात अशी हानी होऊ नये यासाठी पालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मुंब्रा बायपासजवळील काही भागात डोंगराच्या पायथ्याशी सुमारे 2 ते 6 मीटर उंचीच्या आरसीसी पध्दतीच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु झाले आहे. त्यानुसार आतार्पयत 13 भिंतीचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीश जोशी यांनी दिली. यामध्ये 25 मीटरच्या तीन, 9 मीटरची 1, 11 मीटरची 1 आणि 12 मीटरच्या उर्वरीत संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यामुळे गिते कंपाऊंड, नाशिक, एकता नगर, मुंब्रा देवी 1 आणि 2 आणि रेती बंदर आदी भागात या संरक्षक भिंती उभारण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यामुळे येथील 2669 रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

The post मुंब्रा बायपासच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत, 2669 रहिवाशांना दिलासा appeared first on Maharashtra Today.

Source

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading