अर्धापूर दि.22 (शे जुबेर )रात्री बे रात्री ऊस वाहतूक करणा-या वाहनामुळे बरेच अपघात होतात.होणा-या अपघात टाळण्यासाठी वाहनांना व बैलगाडींना रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम शनिवारी (ता.22) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येळेगांव येथे शुभारंभ करण्यात आला.हा कार्यक्रम महामार्ग पोलीस वसमत फाटा व बारड यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला.या कार्यक्रमास भाऊरावचे कार्यकारी संचालक श्याम पाटील,भाऊरावचे उपाध्यक्ष कैलाश दाड,जनसंपर्क अधिकारी शिवाजी धर्माधिकारी हे उपस्थित होते. ऊसाची वाहतूक करणारे,टँक्ट्रर चालक,मालक व बैलगाडी वाले यांना वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान,बारड महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पखाले,आर.टि.ओ कार्यलायाचे मोरे यांनी रस्ते वाहतूक नियमांची माहिती देवून योग्य ते सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भाऊराव कारखान्याचे कर्मचारी,ऊसतोड कामगार,वाहन चालक,मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.