बार मालक राठोड वर गोळीबार करणाऱ्या २ जणांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार सुरेश यांचे नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात तांडा बार नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री ते आपल्या घराकडून दुकानाकडे  निघाले असता २ दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग करत हिंगोली गेट परिसरात त्यांच्यावर गोळीबार केला. सुरेश यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना ताबडतोब ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २ जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी  दिलीपसिंग आणि गुरुप्रीतसिंग यांना अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लहाने हे करत आहेत.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading