आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक तसेच शहरासह जिल्हयातील नागरीकांच्या समस्यासंदर्भात समाजवादी पार्टीच्या पदाधिकाºयांची बैठक महाराष्टÑ मेडीकलच्या बाजुस जिल्हा कार्यालय येथे १३ रोजी रात्री ८ वा. घेण्यात आली.शहर महानगर पालीकेच्या वतीने नागरी सुविधा देण्यात मनपा अपयशी ठरत आहे. मनपाच्या वतीने नळाला १२ ते १५ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांना हिवाळ्यातही पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे. मनपाच्या वतीने किमान चार दिवसाला एकदा पाणी पुरवठा करण्यात यावा या व इतर मागण्यासाठी येणाºया २२ जानेवारी रोजी मनपा कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती प्रदेश सचिव मो. अल्ताफ मेमन यांनी दिली.यावेळी जिल्हाध्यक्ष मंसुर खान, जिल्हा महासचीव मोईन खान, ज्येष्ठ नेते शमशोद्दीन अन्सारी,जि.उपाध्यक्ष खाजा मुजमील, सुधाकर पौळ,अॅड.तकबीर,तसलीम खतीब,रामदास अवचार,सेलू ता.अध्यक्ष शेख दिलावर,ता.अध्यक्ष शेख उस्मान,आदीं उपस्थित होते.