मुंबई: काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काँग्रेसनंऔरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज आहेत. त्यांनी झांबड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.