नांदेड दि. 25 :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पुर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वृत्तपत्रांचे प्रकाशक व सर्व मुद्रक यांची गुरुवार 28 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 4.30 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत प्रकाशक व मुद्रक (Publishers and Printers) यांनी उपस्थित राहण्याचे असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांचेवतीने करण्यात येत आहे