तीन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

उस्मानाबाद: नात्याला काळिमा फासणारी घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. मावशीच्या नवऱ्याने तसंच शाळेतील तीन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यात घडली. धक्कादायक म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अनाथ आहे. याप्रकरणी लोहारा पोलिसात 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 1 आरोपी फरार आहे. मावशी नवरा फरार असल्याचं कळतंय.पीडित मुलगी लोहारा तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत शिकते. बलात्कार करणाऱ्यांमध्ये तीन शिक्षक, एक शिपाई, कृषी विभागाचा कर्मचारी, असे 5 जण असून पीडीत मुलीच्या मावशीच्या नवऱ्याच्याही आरोपीमध्ये समावेश आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading