किनवट पालिकेच्या शिवाजी राजे मंगल कार्यालयाची दुरवस्था

किनवट(अकरम चव्हाण) – लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पालिकेच्या छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालयाची मोठी दुरवस्था झाली आहे.परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले असताना पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील बसस्थानक रस्त्यावर पालिकेचे छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालय आहे. साधारणतः १२ ते १३ वर्षांपूर्वी शहर व परिसरातील नागरिकांना अल्पदरात मंगल कार्यालय मिळावे,यासाठी तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून दुमजली मंगल कार्यालय उभारले.आजघडीला सदर मंगल कार्यालयाची मोठी दुर्दशा झाली आहे.

मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारासह पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील दारे,खिडक्या मोडकळीस आली आहेत.पालिकेच्या दुर्लक्षाने खिडक्यांची दारे,तावदाने चोरीला गेल्याचे दिसत आहे.कोणत्याही कार्यक्रमासाठी अडीच ते ५ हजार रुपये भाडे आकारण्यात येते.परंतु परिसर व आतील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. मंगल कार्यालयाला दारे,खिडक्या नसल्याने आत,बाहेर दारुडे,जुगाऱ्यांसह मोकाट जनावरांचा मुक्तसंचार असतो.शहरात घनकचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छतेवर लाखो रुपये महिन्याकाठी खर्च होत आहेत.असे असताना या मंगल कार्यालयाभोवती मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.आजूबाजूचे सांडपाणी तेथेच जमा होत असून,परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे. इमारतीला रंगरंगोटी नसल्याने ती जीर्ण दिसत असून,भिंतींवरे झुडूपेही वाढली आहेत.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading