ओवेसींचा हा ‘मास्टरस्ट्रोक’, त्याने कॉंग्रेसची वाट लावलीय: इम्तियाज जलील

औरंगाबादः वंचित बहुजन आघाडी सोबत आमची बोलणी सुरू आहे असे सांगून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नांदेड भेटीत प्रकाश आंबेडकर-अशोक चव्हाण यांनी फक्त सोबत चहा घेतला. यावेळी  आघाडी संदर्भात त्यांनी ब्र शब्द काढला नाही असे स्वःत प्रकाश आंबेडकरांनी जाहीर सभेत सांगितले. कॉंग्रेसचा हा ढोंगीपणा उघड करण्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी आंबेडकरांचा योग्य सन्मान राखला तर आम्ही बाजूला होतो अशी सडेतोड भूमिका मांडली. ओवेसींच्या या मास्टरस्ट्रोकने कॉंग्रेसची वाट लावली, अशा शब्दांत आमदार इम्तियाज जलील यांनी ‘सरकारनामा’शी बोलतांना ओवेसींच्या भूमिकेचे समर्थन केले.a

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading