सात वक्फ मंडळ सदस्यांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे शासनाचे आदेश

0 8

नांदेड जिल्ह्यातील देगलूरची एक वक्फ मालमत्ता

नांदेड (प्रतिनिधी) वक्फ मंडळ सदस्यांनी मंडळाच्या हिताला बाधक ठरणारे वर्तन केल्यामुळे सात वक्फ मंडळ सदस्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे पत्र महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव म.स.चौकेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांना दिले आहेत. या सात जणांमध्ये पाथरीचे आमदार बाबा जानी यांच्यासह वकिल, महिला यांचाही समावेश आहे. या मंडळाने घेतलेल्या निर्णयातील एक जागा दर्गाह हजरत जियाउद्दीन अल-रिफाई, देगलूर जि.नांदेड येथील आहे.

शासनाने जारी केलेल्या पत्रात ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन ट्रस्टचे अध्यक्ष शबीर अन्सारी यांनी दिलेल्या पत्रानुसार शासनाने केलेल्या तपासणीनुसार नांदेडच्या दर्गाह हजरत जियाद्दीन अल-रिफाई देगलूर येथील वक्फसंस्थेच्या मालकीच्या जमीनीवर बेकायदेशीर भुखंड तयार करून ते बेकायदेशीर रित्या भाडेपट्टीवर दिले. या संदीर्भाने पाथरीचे आमदार दुर्राणी अब्दुला खान, लतिफ खान उर्फ बाबा जानी आणि हबीब फकीह या वक्फ मंडळाच्या सदस्यांविरुध्द महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाने गंभीर निष्कर्ष नोंदविले होते. या सदस्यांचे हे वर्तन वक्फ हिताला बाधक ठरणारे आहेत. वक्फ मालमत्तांच्या संरक्षणाची काळजी न घेणे व वक्फ मालमत्तेवरील अतिक्रमने दुर करून त्या मालमत्ता वक्फ मंडळाकडे पुर्वत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न न करणे, कायदेशीर प्रक्रिया न राबविणे आणि वक्फ मालमत्तेचे बेकायदेशीर वाटप करण्यासाठी दबाव आणणे अशी कामे या सदस्यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वक्फ मिळकतीचे हस्तांतरण करणारी व्यक्ती दोन वर्षापर्यंत कारावासाच्या शिक्षेस पात्र आहे. वक्फ कायद्यानुसार हा दखल पात्र आणि अ जामीन पात्र गुन्हा आहे. भारतीय दंडविधानातील तरतुदींनुसार या लोकांवर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा.

हबीब फकीह यांच्या जामा मस्जीद, माहिम येथील विश्वस्त पदावरील नियुक्तीचा फेरफार अहवाल स्विकृत करण्याविषयच्या प्रकरणातील मुळ धारिका सर्वोच्च न्यायालयातील वकील शिवाजी जाधव यांच्या ताब्यात कशी गेली व त्या धारीकेच्या शेवटी तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नसीम बानू पटेल यांच्या स्वाक्षरीचा दि. 16 डिसेंबर 2016 चा आदेश मागून धारिकेस जोडण्यात आला किंवा कसे या बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावे असे या पत्रात लिहिलेले आहे.

वक्फ मंडळाच्या दि.3 ऑक्टोबर 2013 रोजीच्या बैठकीत झिंगाबाई टाकळी नागपूर येथील सर्व्हे नंबर 88 मधील जमीन सतरंजीपुरा बडी मस्जीद (बुगदादिया नगर) या वक्फ संस्थेच्या मालिकेचे 288 भुखंड वाटप नियमित करण्याच्या विषयीचा ठराव क्रमांक 77/2013 पारित करण्यात आलेला आहे. हा ठराव वक्फ अधिनियम 1995 मधील तरतूदींचा भंग करणारा आहे. या बैठकीच्या इतिवृत्तावर जैनुद्दीन जव्हेरी, ऍड. आसिफ शौकत कुरेशी, श्रीमती एैनुल चांद अत्तार, आ. दुर्रानी अब्दुला खान उर्फ बाबाजानी, हबीब फकीह, सयद जमील अहमद जानीमिया अशा एकूण सहा वक्फ मंडळ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हा ठराव दृढ करण्यासाठी 27 ऑक्टोबर 2013 रोजी पुन्हा प्रयत्न करण्यात आले. त्यावेळी हे सर्व सहा वक्फ सदस्य उपस्थित होते.

गुलाम महमद वस्तानवी, या वक्फ मंडळ सदस्याने बादशाही मुल्लामस्जीद ट्रस्ट, ब्राम्हण गल्ली मौजे भिंगार ता. व जि. अहमदनगर या वक्फ संस्थेच्या मालकीची सर्व्हे क्रमांक 60 व 61 मधील 32 एकर 23 गुंठे इतकी वक्फ जमीन 99 वर्षाच्या भाडेपट्टयावर घेण्याचा करार डिसेंबर 2003 पासून केला आहे. तेंव्हा पासून वक्फ मालमत्तेवर त्यांचा बेकायदेशीर ताबा आहे. तेंव्हा त्यांच्याही विरुध्द पोलसी ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत.

News by: Nandedlive.com