नांदेड – मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिकांनी रस्त्यांची देखभाल व दुरूस्तीसाठी योग्य पाऊले उचलावीत, अशा कडक सूचना दिल्या आहेत. त्यास अनुसरुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नागरिकांना रस्त्यांच्यासंदर्भात तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.न्यायालयाने जनहित याचिकेवर नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. रस्त्यांची स्थिती सुधारली पाहिजे, अशी जनहित याचिकेवर सुनावणी करण्यात आली. नांदेड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत हॉल क्र. १०६ सार्वजनिक बांधकाम विभाग येथे रस्त्यांची तक्रार दाखल करता येणार आहे. तसेच रस्त्यांच्या नादुरूस्तीबाबत – १८०० २३३ ४९४९ या टोल फ्री क्रमांकावर आणि नांदेडच्या मनपा वेबसाईटवरदेखील नागरिकांना तक्रारी नोंदवता येतील.