नांदेड’ इंधन दरवाढीत राज्यात अव्वल

0 3

नांदेड – पेट्रोल आणि डिझेलची शंभरीकडे जोरदार घोडदौड सुरू असून मध्यंतरी २ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. नांदेड जिल्ह्यात पेट्रोलने ९२ रुपयांचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दराने पेट्रोल विक्री केली जात आहे.नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सोलापूर व मनमाड डेपोतून पेट्रोल येते. त्यामुळे महाराष्ट्रात नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सर्वाधिक दराने पेट्रोल विकले जात असून त्यात तेलंगणा सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक दर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दर असल्याने नागरिक सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहेत. सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. येत्या १५ ते २० दिवसात पेट्रोल शंभरी गाठणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी झळ बसणार आहे.