लवकर निर्णय घ्या नाहीत 288 जागांवर लढणार : प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसचा इशारा

औरंगाबाद :- विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्यासंबंधी काँग्रेसने लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रातील 288 जागा लढवू, असा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आम्ही जोपर्यंत 288 जागा जाहिर करत नाही तोपर्यंतच ही ऑफर समजावी, असेही ते म्हणाले. वंचितच्यावतीने काँग्रेसला 40 जागांची ऑफर देण्यात आली आहे. तर काँग्रेस 40 जागा सोडणे अशक्य असून लोकसभेचीच पुनरावृत्तीच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस सोबत जायचे की नाही याचा दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करण्यात येणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक सोडून जात आहेत. हा या दोन्ही पक्षाच्या धोरणांचा पराभव आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचितची ताकद वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. आता विधानसभेत वंचितचा प्रभाव आणखी वाढणार आहे. वंचित मध्ये आयाराम, गयारामांना प्रवेश नाही असंही त्यांनी सांगितलं.

आंबेडकर म्हणाले, रा. स्व. संघ आणि भाजपला कधीही तत्वे नव्हती. त्यांनी तत्वांचा फक्त मुलामा दिला. वर्तमानपत्रांनी त्यांना महत्व दिले. काँग्रेस आणि त्यांच्या पुढा-यांनी भ्रष्टाचार केला. त्याचा पाढा रास्व संघाने आणि भाजपने वाचला. लोकसभेत आम्ही भाजपची बी टीम आणि विधानसभेत सोबत या हे काय आहे याचा खुलासा काँग्रेसने करावा, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांची निवडणूक आयोगासोबतची भेट ही पब्लिसिटी स्टंट होता, पब्लिसिटी स्टंटच्या पाठीशी मी नाही, असे म्हणत ते म्हणाले, ईव्हीएमबाबत आम्ही न्यायालयात जाणारे आहोत. न्यायालय म्हणते ईव्हीएममध्ये घोळ नाही. पण कुठे मतदान कमी निघाले तर कुठे जास्त याचे उत्तरही न्यायालयाला द्यावे लागेल.

ही बातमी पण वाचा : वंचितकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर हेच असतील – अण्णासाहेब पाटील

The post लवकर निर्णय घ्या नाहीत 288 जागांवर लढणार : प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसचा इशारा appeared first on Maharashtra Today.

Source

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading