मुंबई | युती जर झाली नाही तर शिवसेनेची 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केविलवाणी अवस्था होऊ शकते, असं मतं शिवसेनेच्या खासदारांनी खासगीत व्यक्त केलं आहे. युती न झाल्यास लढणार नाही, असा आक्रमक पवित्रा देखील शिवसेनेच्या 5 खासदारांनी घेतला आहे, असंही कळतयं.यावेळी जर युती झाली नाही तर शिवसेनेला दुहेरी आकडा गाठणं देखील अशक्य आहे, असं शिवसेनेच्या काही खासदारांना मतं आहे.
शिरूरचे खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात याचं भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवण्याचा निर्णय शिवसेना खासदारांनी घेतला आहे.दरम्यान, आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे असा निर्णय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झाला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.