सातारा – मराठा समाजाकडून महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी या पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून सुरेश पाटील यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, मराठा मोर्चानं पक्षाचं नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असं ठेवण्यास विरोध केला. या नावांमध्ये मराठा समाजाची अस्मिता दडली आहे. त्यामुळे पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांती सेना ठेवले, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली.