मुंबई | मनसेला महाआघाडीत घेण्यात येणार असेल तर आम्ही आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा समाजावादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी काँग्रेसला दिला आहे. याबाबत अखिलेश यादव यांना पत्र लिहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मनसेकडून उत्तर भारतीयांचा अपमान करण्यात आला आहे त्यामुळं त्यांना आघाडीत घेण्यात येऊ नये , असं अबु आझमी यांनी म्हटलं आहे.समाजवादी पक्षाच्या नेतृत्वानं मनसेबाबत भूमिका घेतली नाही तर पक्षाच्या विरोधात जाणार असल्याचं अबु आझमी म्हणाले आहेत.