नांदेड;दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क विभाग, नांदेड या कार्यालयाने दिनांक 28.12.2019 रोजी दिलेल्या प्रेस नोट क्र 670 नुसार गाडी संख्या 17063 मनमाड ते सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेस च्या वेळेत दिनांक 10 जानेवारी 2020 पासून बदल करण्यात येणार होता.
परंतु हा प्रस्तावित बदल आज दिनांक 01 जानेवारी 2020 रोजी दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालया कडून प्राप्त पत्रानुसार रद्द करण्यात आला आहे.
दिनांक 10 जानेवारी 2020 पासून हि गाडी सद्या धावत असेलल्या वेळेनुसारच धावेल. या गाडीच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.